कर्नाटकमधील राजीनामा दिलेले आमदार मुंबईत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

कर्नाटकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून काँग्रेसचे 9 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर हे आमदार मुंबईत डेरेदाखल झाले आहेत.

या 12 आमदारांचा राजीनामा जर मंजूर झाला तर कुमारस्वामी सरकार अल्पमतात येऊन कोसळेल. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे या आमदारांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 12 पैकी 10 आमदार सध्या मुंबईत आले आहे. मुंबईतल्या रेनेसेन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. कर्नाटकमधील संकट पाहता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीत ज्योतिरादित्य सिंधिया, गुलाम नबी आझाद, मोतीला व्होरा आणि दीपेंद्र हुड्डा यांचा समावेश आहे.