डिजिटल व्यवहार 51 टक्क्यांनी वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशात डिजिटल ट्रांजेक्शन मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. 2018-19 या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये 51 टक्क्यांची वाढ झाली हा व्यवहार 3133 कोटींच्या पार पोचला आहे, अशी माहिती आज संसदेत सरकारने दिली. इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात 31 एप्रिल 2019 पर्यंत 313 कोटींचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. डिजिटल व्यवहारात नागरिकांना कोणत्याही अडचणी येत नसल्याचे  रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. भीम ऍपमधून एप्रिल 2017 मध्ये 31.2 लाखांचे डिजिटल व्यवहार झाले होते. 2019 मध्ये ते वाढून 154 लाख झाले आहेत.