
सामना ऑनलाईन । मेदिनीनगर
बहुजन समाज पार्टीच्या झारखंड शाखेने झारखंड विधानसभेतील आपले एकमेव आमदार कुशवाहा शिवपूजन मेहता यांना पक्षविरोधी कारवाया आणि मतदारसंघाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. मेहता यांनी मात्र आपण कोणतेही पक्षविरोधी काम केलेले नसून आपल्याला पक्षाकडून बडतर्फीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.
झारखंडच्या पालामाऊ जिह्यातील हुसेनाबाद विधानसभा मतदारसंघातून बसपाचे राज्यातील एकमेव आमदार कुशवाहा निवडून आले आहेत. कुशवाहा हे मतदारसंघाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या अनेक तक्रारी मतदारांकडून आल्या आहेत. तसेच त्यांच्या अनेक पक्षविरोधी कारवायांची माहिती पक्षाला मिळाली आहे. त्यामुळेच बसपाच्या राज्य शाखेने त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बसपा झारखंड प्रदेशाध्यक्ष सुबल दास यांनी दिली.


























































