
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रकार वाढत असून आज बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प होती. जेसीबीने दरड हटविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरु झाली.




























































