हिंदुस्थानी प्रशिक्षक पदासाठीच्या मुलाखती स्वातंत्र्यदिनानंतरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bcci-logo

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या मुलाखती स्वातंत्र्यदिनानंतरच होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. क्रिकेट सल्लागार समितीतील कपिलदेव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या खांद्यावर टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी आहे. मात्र कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी असल्यामुळे याआधी 13 किंवा 14 ऑगस्ट रोजी होणाऱया मुलाखती आता 15 ऑगस्टनंतरच होणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी फक्त सहा अर्ज आले आहेत. त्यामुळे मुलाखतीची प्रक्रिया ही एका दिवसात पूर्ण होणार आहे. प्रशिक्षक निवडण्याचा अधिकार क्रिकेट सल्लागार समितीकडेच असणार आहे. यामध्ये कर्णधार किंवा प्रशासकीय समिती ढवळाढवळ करू शकणार नाही. तसेच या समितीकडून निवडण्यात येणाऱ्या सर्वोत्तम तीन व्यक्तींपैकी एकालाच प्रशिक्षकपदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. फक्त नियम बीसीसीआयचे असणार आहेत. बीसीसीआयच्या सर्व नियमात बसणाऱ्या व्यक्तीचीच या पदासाठी अखेर निवड होईल.