40,200, सोन्याची चाळिशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे भाव वाढल्याने सोन्याचे दर आता थेट 40 हजार 220 रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. आंतररष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असल्याने गुंतकणूवदार सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात सोन्याचे दर तब्बल साडे पाच हजारांनी वाढले आहेत.पहिल्यांदाच सोन्याचा भाव इतक्या स्तरावर पोहोचल्याचे तज्ञ सांगत आहेत. चांदीच्या दरातही 200 रुपयांची वाढ होऊन प्रतिकिलो दर 49,050 रुपयांवर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे रुपयात झालेली घसरण आणि आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेता सोन्याचे दर आणखी काढण्याची शक्यता कर्तकली जात आहे.