बैलाच्या धडकेने शेतकऱ्याचा मृत्यू; ब्राह्मणगाव येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथून  8 कि.मी. अंतरावरील  मौजे ब्राह्मणगाव येथील आसाराम भाऊसिंग राठोड ( वय 48) यांचा शुक्रवारी सकाळी बैलाच्या धडकेने मृत्यू झाला. बैल पोळा सणाच्या निमीत्ताने बैलांना पाण्याने स्वच्छ करत असताना बैलाने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना उपचारासाठी  जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर या रुग्णालयात शवविच्छेदन करुन चारठाणा पोलीस ठाण्याचे ब्राम्हणगाव बीट जमादार गुलाब भिसे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.  या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राठोड यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुले असा परिवार आहे.  ऐन पोळा सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.  या घटनेमुळे ग्रामस्थांनी बैल पोळा सण साजरा केला नाही.