
छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचा मुलगा आमदार अमित जोगी यांना फसवणुकीच्या आरोपाखाली मंगळवारी सकाळी स्थानिक पोलिसांनी त्यांच्या घरी बेड्या ठोकल्या. शपथपत्रात त्यांनी जन्मस्थान आणि जन्मवर्ष याबाबत जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तत्पूर्वी सोमवारी भाजप नेते समीरा पैकरा यांच्यासहित मरवाही येथील आदिवासी नागरिकांनी अमित जोगी यांच्या अटकेची मागणी करत पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला घेराव घातला होता. आमदार अमित जोगी यांच्याविरोधात कलम 420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जोगी यांनी शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप भाजप नेते समीरा पैकरा यांनी केला आहे. शपथपत्रात जोगी यांनी जन्मवर्ष 1978 सांगितले असून जन्मस्थान सारबहरा गैरोला हे सांगितले आहे. वास्तवात त्यांचा जन्म 1977 साली अमेरिकेत झाला आहे.



























































