
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातील महिलांशी संवाद साधण्यासाठी महिला संपर्क प्रमुख संपदा गडकरी तीन दिवशीय जिल्हा दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर बीड आणि गेवराई येथील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ऍड संगीताताई चव्हाण यांनी केले आहे.
सोमवार 9 सप्टेंबर रोजी 11 वा. बार्शी नाका येथे विभाग कार्यकारणी मेळावा व शिवबंधन, दुपारी 2 वा. बालेपीर कार्यकारणी मेळावा व शिवबंधन करण्यात येणार आहे. मंगळवार 10 सप्टेंबर रोजी 10 वा. शासकीय विश्राम गृह येथे शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी जिल्हा बैठक, दुपारी 1 वाजता पाटोदा येथे तालुका पदाधिकारी व कार्यकारणी बैठक, दुपारी 4 वा. आष्टी येथील शासकीय विश्रामगृह महिला पदाधिकारी व कार्यकारणी बैठक तर सायंकाळी 6 वा. शिरूर तालुका महिला बैठक घेण्यात येणार आहे.
बुधवारी 11 सप्टेंबर रोजी जिल्हा कार्यकारणी मेळावा घेणार आहेत. तरी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ऍड संगीताताई चव्हाण, उपजिल्हा प्रमुख फरजाना शेख, शांता राऊत, शामल पवार, सोनाली खोडसे, स्वाती प्रधान, सारिका डोंगरे, मधुमती शेजुळ, सलीमा पठाण, रेखा इंगोले, भागीरथी जाधव यांनी केले आहे.























































