
नायर रुग्णालयातील विद्यार्थिनी डॉ. पायल तडकी हिची हत्या झाली नसल्याचे फॉरेन्सिकच्या अहवालातून उघड झाले आहे. पायल हिच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील काही दिवसांतच फॉरेन्सिक विभागाचे सायबर युनिट मुंबई पोलिसांकडे आपला अंतिम अहवाल देणार आहे. त्यातून या प्रकरणातील आणखी सत्य उजेडात येण्याची चिन्हे आहेत. 26 वर्षीय डॉ. पायल तडकी ही नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने हॉस्टेलमध्ये 22 मे 2019 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ डॉक्टरांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. याचवेळी तिची हत्या झाल्याचाही संशय वर्तविला गेला होता. त्या अनुषंगाने फॉरेन्सिक किभागाने डॉ. पायल हिच्या खोलीतील किकिध नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. यात पायलने गळफास घेण्यासाठी वापरलेली ओढणी, नखांना लागलेले रक्त, मोबाईल फोन आदी बाबींचा समावेश होता. या नमुन्यांच्या तपासणीअंती पायल हिची हत्या झाल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली आहे.


























































