
अंधेरी पूल दुर्घटनेनंतर दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला वसईतील जुना अंबाडी रेल्वे उड्डाणपूल पुन्हा एकदा लटकला आहे. या पुलावरील अतिरिक्त भार काढून टाकल्यानंतर त्याची दुरुस्ती रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेने करायची, हा यक्षप्रश्श्र यंत्रणांसमोर उभा राहत असल्याने या कामाची रखडपट्टी झाली आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल व वाहतुकीसाठी बंद असल्याने नव्या पुलाकर कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत.
वसईच्या जुन्या अंबाडी पुलाच्या दुरुस्तीसाठी गेल्यावर्षी मूहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेने पुलावरील अतिरिक्त भार काढण्यास गेल्या कर्षी 13 ऑक्टोबरपासून सुरुवात केली. रेल्वे उड्डाणपुलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितरणचे केबल, खासगी मोबाईल कंपन्यांच्या वायर काढून टाकल्या होत्या. त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे काढून टाकण्यात आले. तसेच पुलावरील विशिष्ट जाडीचा काँक्रीटचा अतिरिक्त थरही काढल्याने पुलावरील वजन कमी झाले होते. मात्र आता सहा महिने या पुलाच्या डागडुजीचे काम थांबविण्यात आल्याने शहरात कोंडीची मोठी समस्या उद्भवली असून अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा उद्विग्न प्रश्नही सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.
रेल्वेला ब्लॉक अपुरा
रेल्वेने या कामासाठी आतापर्यंत 70 ते 75 लाख रुपये खर्च केले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला मेगाब्लॉक घ्यावा लागणार असून रात्रीच्या वेळी दीड ते दोन तासांचा दुरुस्तीसाठी मिळणारा ब्लॉक अपुरा पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

























































