‘इंटक’चे कर्मचारी भारतीय कामगार सेनेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
intuc-bhartiya-kamgar-sena

विक्रमगड तालुक्यातील आंबिवली येथील दिवेकर वॉलस्टेबे ऍड सायडर प्रिसिशन सिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील इंटक कामगार संघटनेचे सभासद असलेल्या सर्व कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. या कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सहचिटणीस दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. त्यानंतर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीत कामगारांच्या प्रलंबित मागण्या आणि युनियनच्या भावी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एचआर संदीप बिडवे, सहचिटणीस जगदीश निकम, संदीप पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, कार्यकारिणी सदस्य किरण भोईर, संदेश ढोणे, ज्ञानेश्वर ठाकरे, दीपक पाटील आणि कामगार उपस्थित होते.