
#MahaElection भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री अमित शहा गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोनच दिवसांपूर्वी शहा मुंबईत येऊन गेले. गोरेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात कलम 370 च्या मुद्दय़ावर मार्गदर्शन करत हा विषय निवडणुकीच्या निमित्ताने घराघरात घेऊन जा असे आवाहन केले होते. त्यानंतर शहा हे पुन्हा लगेचच मुंबई दौऱयावर येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


























































