मुकेश अंबानींची संपत्ती 3 लाख 80 हजार कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा, ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी हे सलग आठव्या वर्षी हिंदुस्थानात सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत. ‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट’च्या अहवालानुसार अंबानी यांची संपत्ती 3 लाख 80 हजार 700 कोटींच्या घरात गेली आहे.

‘आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया’ने हिंदुस्थानातील श्रीमंत लोकांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत अंबानींपाठोपाठ लंडनस्थित हिंदुजा बंधूंचा दुसरा क्रमांक असून त्यांची संपत्ती 1 लाख 86 हजार 500 कोटींवर गेली आहे. तिसर्‍या क्रमांकावरील विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांची संपत्ती 1 लाख 17 हजार 100 कोटी असल्याची माहिती पुढे आली आहे. 1 हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या धनाढय़ांची संख्या गेल्या वर्षीच्या 831वरून 953वर गेली आहे. डॉलर मूल्याच्या बाबतीत अब्जाधीशांच्या संख्येत 141वरून 138पर्यंत घट झाली आहे. देशातील आघाडीच्या 25 श्रीमंतांची एकूण संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या 10 टक्क्यांइतकी आहे. 344 श्रीमंत लोकांच्या संपत्तीत यंदा घट झाली आहे. 112 लोकांची संपत्ती 1 हजार कोटींहून कमी आहे. 82 अनिवासी हिंदुस्थानींचा या यादीत समावेश आहे.

‘टॉप फाइव्ह’ श्रीमंत

उद्योजक        संपत्ती  (कोटींमध्ये)

मुकेश अंबानी 3,80,700

हिंदुजा बंधू      1,86,500

अझीम प्रेमजी 1,17,100

एल.एन. मित्तल   1,07,300

गौतम अदानी  94,500