
मालवण कुडाळ तालुक्यात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. रविवारी चिंदर पालकरवाडी (मालवण) येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.कणकवली विजयभवन येथे झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी भास्कर पालकर, वेदांत गोलतकर, भालचंद्र गोलतकर, लोकेश गोलतकर,नयन माधव, प्रकाश लब्दे, गोपाळ पालकर, गणेश पालकर, सदानंद पालकर, भिरोजी पालकर,श्रद्धा म्हापसेकर, समीक्षा पाताडे, नम्रता पालकर, गौरी पाटणकर, अंजनी पालकर, समीक्षा पाटणकर, गजानन पाटणकर, शिशिर पालकर, शेखर पालकर, रवींद्र पालकर, योगेश चव्हाण, मनिष सावंत, आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यातील असंख्य विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. चिंदर गावातही त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला आहे. गावाचा सर्वांगिण विकास शिवसेनेच्या माध्यमातून आमदार वैभव नाईकच करू शकतात याच भावनेतून आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
यावेळी भाऊ परब, समीर हडकर, अनिल गावकर, समीर लब्दे, संजय हडपी, संजय माळकर, प्रकाश पराडकर, मिलिंद चिंदरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.






























































