क्रिकेटनंतर धोनी ‘या’ खेळात हात आजमावणार, फोटो व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार, दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासून धोनीने क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. धोनी निवृत्ती घेणार असल्याची चर्चा या काळात रंगू लागली. परंतु अद्याप त्याने याबाबत घोषणा केलेली नसली तरी निवृत्तीनंतर तो काय करणार याबाबती चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान त्याचे बिलियर्ड्स (billiards) खेळतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

झारखंड क्रिकेट असोसिएशन मैदानामध्ये धोनी बिलियर्ड्स (billiards) खेळताना दिसून आला. धोनीसोबत ज्येष्ठ पिच क्यूरेटर बासू दा आणि बहरागोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल सारंगी यांनीही बिलियर्ड्स (billiards) चा आनंद लुटला. कुणार सारंगी यांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे धोनी क्रिकेटनंतर बिलियर्ड्स (billiards) मध्ये हात आजमावणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

dhoni

धोनीला क्रिकेटसह रेसिंगचीही आवड आहे. त्याच्याकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. तसेच फूटबॉलमध्येही त्याची रुची आहे. धोनीचा एक फूटबॉल क्लबही आहे. आता त्याने बिलियर्ड्स (billiards)मध्येही हात आजमावले आहेत.

संथ फलंदाजीवर टीका
जगातील ‘बेस्ट फिनिशर’ असे बिरूद मिरवणारा धोनी विश्वचषकामध्ये फ्लॉप राहिला होता. त्याच्या संथ फलंदाजीवर अनेकांनी टिका केली होती. सेमीफायनलमध्ये रनआऊट झाल्यानंतरही त्याच्यावर टिकेचा भडीमार झाला होता. विश्वचषक संपल्यानंतर त्याने विंडीजविरुद्ध मालिकेतून विश्रांती घेतली. त्यानंतर तो आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करणार असल्याचे माहिती मिळाली, परंतु तो या मालिकेतूनही बाहेर राहिला. आता त्याने आपली सुट्टी आणखी वाढवली आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याच्या पुनरागमानाचे वेध लागले आहेत.