
‘विकी वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख क्यक्तिरेखा आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील या मुखकटय़ामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती 6 डिसेंबर रोजी ‘किकी केलिंगकर’ प्रदर्शित होईपर्यंत ताणली जाणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे. ‘किकी केलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ कर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरून ही क्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या क्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखकटय़ामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली जात नाही. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टरची टॅगलाइनसुद्धा ‘कुप्रकृत्ती मुखवटय़ामागे लपू शकत नाही’ अशाच आशयाची आहे.
























































