पंतप्रधान मोदींच्या पुतणीची पर्स चोरणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची पर्स हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. नोनू असं या चोरट्याचं नाव असून त्याच्यासोबत असलेला एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे.

दमयंती बेन शनिवारी सकाळी अमृतसरहून दिल्ली येथे आल्या होत्या. त्यांच्यासाठी सिव्हिल लाईन्स परिसरातील गुजराती भवनमध्ये एक रुम बुक करण्यात आला होता. यामुळे जुनी दिल्ली येथून रिक्षातून त्या आपल्या कुटुंबासह गुजराती भवन येथे पोहचल्या. भवनच्या प्रवेशद्वारावर रिक्षातून त्या उतरत असतानाच अचानक स्कुटीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या हातातली पर्स खेचली व पळ काढला. पर्समध्ये 56 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती.

सिव्हिल लाईन्स पोलिसांनी दमयंती यांची तक्रार नोंदवून घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यात दोन्ही चोरटे स्कूटरवरून पळताना दिसत आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी नोनूला अटक केली. त्याच्याकडून दमयंती बेन यांची पर्स आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.