1 / 7
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे स्मिता पाटील. आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या अभिनेत्रीची आज जयंती आहे. यानिमित्त स्मिता यांच्या जीवनावर एक झलक टाकूया.
स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी होते. तर आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या.
स्मिताने पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. यानंतर श्याम बेनेगल यांच्या 'चरणदास चोर' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले.























































