विद्या मंदिर दहिसरला लेझीममध्ये द्वितीय क्रमांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाच्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई आर पूर्व विभागीय लेझीम स्पर्धेत विद्या मंदिर दहिसरच्या लेझीम पथकाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच नवव्यांदा बक्षीस पात्र ठरले. या पथकामध्ये अनुजा जाधव, साक्षी चाफेकर, आचल मोरे, दिव्या भारती, समिक्षा खरात, ऋतूजा खेबाळे, श्रुती तेलंग, स्नेहल वीर, सृष्टी पाटील, तेजश्री पाटील, भूमी घुमाडे, तेजश्री गोसावी, सिद्धि कळंबटे यांच्यासह 40 लेझीमपटू व अप्रतिम वाद्यवृंद यांचा स्पृहणीय सहभाग होता.

या यशस्वी लेझीम पथकाला शाळेचे क्रीडा प्रशिक्षक व लेझीम पंच विठ्ठल सुळे यांच्या हलगीची अप्रतिम साथ व मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने विद्या मंदिरने नेत्रदीपक प्रात्यक्षिके करून स्पर्धेत निर्विवाद आपला ठसा उमटविला. या हरहुन्नरी लेझीम पथकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्वांना मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.