
प्लास्टिक बंदीमुळे बाजारात पर्यावरणपूरक वस्तूंची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेऊन हैदराबादमधील एका कंपनीने एक असा कप बनवला आहे, ज्यात आपण थंड आणि गरम पेय प्यायल्यानंतर हा कप फेकून देण्याऐवजीतो खाऊ शकतो. कंपनीचा असा दावा केला आहे की हा कप इतका मजबूत आहेत की, आपण त्यात सर्व प्रकारची पेय ठेवू शकाल. हा कप धान्यापासून बनवण्यात आला असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.
हा कप हैदराबादमधील एका खासगी कंपनीने बनवला आहे. मानवी शरीर तसेच निसर्गासाठी हानिकारक असलेल्या वस्तूंचा वापर कमी करणे, हे आपले लक्ष्य असल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक अशोक कुमार म्हणाले की, ‘ईट कप’ नैसर्गिक धान्यापासून बनविला गेला आहे, जो प्लास्टिक आणि कागदाला मजबूत पर्याय आहे.
Hyderabad: Edible cups launched for serving hot and cold beverages
Read @ANI story | https://t.co/R761RWcTbF pic.twitter.com/Va3bPNxP0R
— ANI Digital (@ani_digital) October 18, 2019



























































