
बुधवारी रात्री उशिरा डहाणू व तलासरीतील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के बसले. त्याची तीक्रता मोठी नसली तरी असंख्य ग्रामस्थांनी जिवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला. लहान मुले, महिला, वृद्ध यांनी कोणत्याही क्षणी भूकंप होईल या भीतीने घराबाहेरच रात्र जागून काढली.
डहाणू तालुक्यातील कासा, दाभोणसह अनेक गावांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. तलासरीही हादरून गेले. रात्री पावणेदहा ते सवाअकरापर्यंत सहा वेळा भूकंप झाला. त्याची तीक्रता 2.6 रिश्टर स्केल एवढी होती. घरातील भांडी खाली पडली. पत्रेही उडाले. पुन्हा पालघर जिल्हा भूकंपाने हादरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.























































