
फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये बारावीचा परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थी 15 नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह 25 नोव्हेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरू शकतात. याआधी 3 ते 23 ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह तर 8 नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची मुदत होती. पण अर्ज भरण्यावेळी काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी www.medahed ahedscedboard.medahe darash edtra.goved.inतसेच www.medahedahedsced board.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरू शकतात.























































