हरयाणात दुष्यंत चौटाला होणार उपमुख्यमंत्री, रविवारी शपथविधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांना सरकार बनवण्यासाठी निमंत्रण दिले आहे. यापूर्वी खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन 57आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता.

रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती मनोहर लाल खट्टर यांनी दिली आहे. तसेच इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार की नाही याबाबत अजून काही कळालेले नाही. जेजेपीचे अध्यक्ष दुष्यंत चौटालाच उपमुख्यमंत्री होतील असे मनोहर लाल खट्टर यांनी स्पष्ट केले. तसेच रविआरी दुपारी 2.15 राजभवनात शपथविधी सोहळा पार पाडला जाईल असेही खट्टर म्हणाले.

शुक्रवारी रात्री भाजप आणि जेजेपीच्या युतीची घोषणा झाली. चौटाला यांच्या जेजेपीने हरयाणात 10 जागा जिंकल्या आहेत. भाजपा ४० जागांवर यश मिळाले आहे. बहुमतासाठी 46 जागांची गरज आहे. त्यामुळे जेजेपीकडे किंगमेकरची भुमिका आली होती. भाजपध्यक्ष अमित शहा, मनोहरलाल खट्टर आणि दुष्यंत सिंह चौटाला यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युती जाहीर केली. तसेच जेजेपीला उपमुख्यमंत्री दिले जाईल असेही या परिषदेत जाहीर करण्यात आले.