‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ अशी मराठी पाटीच हवी, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगाव येथील प्राइम स्टुडिओने इंग्रजी अक्षरातील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ पाटी लावली आहे. शिवसेनेने चित्रनगरीच्या प्रवेशद्वारावरील या इंग्रजी अक्षरातील पाटीला विरोध केला असून सात दिवसांच्या आत मुख्य प्रवेशद्वारावर ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ अशी मराठी पाटी लावा, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

शिवसेना शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी चित्रनगरीच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिले असून चित्रनगरीची प्राइम फोकस स्टुडिओची इंग्रजी पाटी लवकरात लवकर बदलून त्याजागी मराठीतील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी/प्राइम स्टुडिओ’ अशी मराठी अक्षरातील पाटी लावण्याची मागणी केली आहे. सात दिवसांत इंग्रजी पाटी न बदलल्यास शिवसेना स्टाइलने कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही गाढवे यांनी दिला आहे.