मशिदीसाठी जमीन घ्यायची का? सुन्नी वक्फ बोर्डचा 26 नोव्हेंबरला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील जमीन श्रीराम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा अयोध्येतच सरकारने द्यावी, असा निकाल रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निकाल मुस्लिमांनी मान्य केला असला तरी न्यायालय देणार असलेली ही जमीन घ्यायची की नाही यावर मुस्लिमांमध्ये एकमत नाही. सुन्नी वक्फ बोर्डाच्या 26 नोव्हेंबरला होणाऱया बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष झफर फारुकी म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जमीन घ्यायची की नाही याबाबत बोर्डाच्या सदस्यांमध्ये एकमत नाही. त्यामुळे 13 नोव्हेंबरला होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता ही बैठक 26 नोव्हेंबरला होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, मात्र माझ्या मते याबाबत सकारात्मक निर्णय होईल.’