11 महिन्यांनंतर वाहन उद्योगाला सुगीचे दिवस, ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
car

मंदीचा फटका सोसत असलेल्या वाहन उद्योगाला अखेर 11 महिन्यांनंतर सुगीचे दिवस आले आहेत. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सकडून जारी केलेल्या अहवालानुसार ऑक्टोबर 2019 मध्ये प्रवासी वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत तब्बल 0.28 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात 2,85,027 प्रवासी वाहनांची विक्री करण्यात आली. गेल्या वर्षी याच महिन्यात 2,84,223 इतक्या वाहनांची विक्री झाली होती. एसयूव्ही श्रेणीतील वाहनांचा यात मोठा भाग आहे. दसरा आणि दीपावली सणानिमित्तही मोठय़ा प्रमाणावर वाहनखरेदी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.