
कोणतेही असो त्या संकटाचा सामना करण्याची ताकद शिवसेनेत आहे. तुम्ही चिंता करू नका, ओल्या दुष्काळात शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. परिस्थिती कोणतीही असो खचायचे नाही, धीर सोडायचा नाही. आपल्या कुटुंबासाठी, लेकराबाळांसाठी पाय रोवून उभे राहायचे असे भावनिक आवाहन युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य अंकित प्रभू यांनी केले.
युवासेना कोअर कमिटी सदस्य अंकित प्रभू यांनी शनिवारी माजलगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. प्रभू यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. भयाण परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम अंकित प्रभू यांनी केले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, युवा जिल्हाधिकारी सागर बहिर, उपजिल्हा प्रमुख सुशिल पिंगळे, उपजिल्हा प्रमुख रामराजे सोळंके, विद्यार्थी सेनेचे अतुल दुबे, शहरप्रमुख पापा सोंळके, उपतालुका प्रमुख अतुल उगले, माजी नगरसेवक मच्छिंद्र मामा काळे यांची उपस्थिती होती.























































