
टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) नोव्हेंबर अखेरपर्यंत कॉल जोडणी शुल्कावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.गेल्या आठवडय़ात ट्रायने इंटरकनेक्ट युसेज चार्जेस (आययूसी) वर चर्चा करण्यासाठी देशातील टेलिकॉम कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावले होते. आययूसी रद्द करण्याची तारीख 1 जानेवारी 2020 आहे. ही तारीख पुढे ढकलण्याची गरज आहे का, याबाबत बैठकीत चर्चा झाली. आता अंतिम निर्णय नोव्हेंबर अखेरपर्यंत येईल, असे ट्रायच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने कॉल कनेक्ट शुल्काला विरोध केला आहे. मोफत कॉलिंग सुविधा बंद होऊन ग्राहकांच्या खिशाला भार पडेल, असे जिओचे म्हणणे आहे. शून्य कॉल कनेक्ट चार्जची तारीख जानेवारी 2020 च्या पुढे गेली तर ग्राहकांना परवडणाऱया टेलिकॉम सर्विसवर परिणाम होईल, असे मत ट्रायच्या ओपन हाऊसमध्येही जिओने मांडले होते.


























































