21 वर्षांचं नातं संपुष्टात, अर्जुन रामपाल आणि मेहेरचा घटस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अर्जुन रामपाल आणि मेहेर

21 वर्षांच्या संसारानंतर अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिका यांच नातं संपुष्टात आले आहे. या दोघांनीही सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे.

‘मुंबई मिरर’ने याबद्दल वृत्त दिले आहे. त्यानंतर मुख्य न्यायाधीश शैलजा सावंत यांनी विवाह कायद्यांतर्गत या दोघांचा घटस्फोट अर्ज मान्य केला. अर्जुन आणि मेहेर यांनी कुटुंब न्यायालयात यावर्षी 30 एप्रिल रोजी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. सहा महिन्यानंतर त्यांना घटस्फोट मिळाला.

दरम्यान, दोन्ही मुली आई मेहेर बरोबर राहणार आहेत. अर्जुन व मेहेर यांच्यात 2011 सालापासूनच वाद सुरू झाला होता. 2018 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अर्जुन घर सोडून भाड्याच्या घरात राहू लागला होता. त्यानंतर अर्जुनने गर्लफ्रेंड गॅब्रएला बरोबर लग्न केल्याच्या वावड्या उठल्या. पण अर्जुनने त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काही दिवसांपूर्वीच अर्जुन व गॅब्रएला आई बाबा झाले. त्यांना मुलगा झाला असून त्याचं नाव अरिक असं ठेवण्यात आले आहे. अर्जुन सध्या अरिकबरोबर वेळ घालवत असल्याचे बोललं जात आहे.