
बॉलीवूडमध्ये खळबळ माजवणाऱ्या मी टू प्रकरणामुळे चर्चेत आलेले गायक, संगीतकार अनु मलिक यांनी इंडियन आयडॉल या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गायिका सोना महापात्राने अनु मलिक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. लैंगिक शोषणाचे आरोप असून देखील इंडियन आयडॉल शोमध्ये अनु मलिकला पुन्हा घेतल्याने महापात्राणे सोनी वाहिनीला धारेवर धरले होते. अखेर हे प्रकरण चिघळत असल्याने अनु मलिकने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता जज म्हणून कुणाची वर्णी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



























































