जालियनवाला बाग घडवण्याचा पुन्हा प्रयत्न! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रखर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
CM uddhav-thackeray

आज देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय अशी भीती तरुणांच्या मनात आहे, असा प्रखर हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केला.

मला धास्ती याच गोष्टीची वाटते की, ज्या देशात युवक बिथरतो तो देश स्थिर राहू शकत नाही. म्हणून मी केंद्र सरकारला सांगतोय की, तुम्ही युवकांना बिथरवू नका. युवक हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत, युवक ही आपली शक्ती आहे. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये लवकरात लवकर 2021 मध्ये संपूर्ण जगातला हिंदुस्थान हा तरुण देश होणार आहे असं सांगितलं जातं. तेव्हा ही युवाशक्ती म्हणजे युवाबॉम्ब आहे. त्या बॉम्बची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये ही मी केंद्र सरकारला नम्र विनंती करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.