नेवाळेत भाडेकरूने घरात घातला बॉम्बचा कारखाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

आरोपींची माहिती लपवणाऱया घरमालकाकिरोधात गुन्हा दाखल

कळंबोलीतील सुधागड एज्युकेशन शाळेलगत  स्फोट करून घातपात करण्यासाठी आरोपींनी नेवाळे येथील भाडय़ाच्या घरामध्ये बॉम्ब बनवला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. या आरोपींना घर भाडय़ाने देताना घरमालकाने नियमानुसार त्यांची माहिती पोलीस ठाण्याला दिली नसल्याचेही तपासात उघड झाले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी घरमालक देवनाथ काथारा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कळंबोलीतील बॉम्ब प्रकरणातील आरोपी दीपक दांडेकर, मनीष भगत आणि सुशिल साठे या तिघांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी पनवेलच्या नेवाळे टेंभोडे येथील रूम नं. 4 भाडय़ाने घेतला होता. दीपक दांडेकर याने बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱया वस्तू वेगवेगळ्या ठिकाणाकरून जमवून त्या माध्यमातून तीन महिन्यांमध्ये टाइम बॉम्ब तयार केला. त्यानंतर या आरोपींनी दांडेकरच्या होंडासिटी कारमधून सुमारे 45 किलो वजनाच्या बॉक्ससह बनवलेला बॉम्ब कळंबोलीतील सुधागड शाळेलगत हातगाडीकर नेऊन ठेवला होता. मात्र दुसऱया दिवशी त्याचा स्फोट होण्याआधीच हातगाडीकर बॉम्ब सापडल्याने मोठा घातपात टळला.  त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करून आरोपी दीपक दांडेकर, मनीष भगत व सुशिल साठे या तिघांना अटक केल्यानंतर ही माहिती तपासात उघड झाली.

कडक कारवाई करणार!

घर भाडय़ाने देताना भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश आहेत. मात्र अनेक घरमालकांकडून भाडोत्रींची माहिती लपवली जात असल्याचे या प्रकरणाने पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. हा प्रकार खपवला जाणार नसून भाडेकरूंची लपवाछपवी करणाऱया घरमालकांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.