
औसा तालुक्यातील बाणेगाव येथील 48 वर्षीय शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बानेगाव औसा येथील महाळप्पा राजाराम गाडेकर वय 48 यांनी आपल्या कुटुंबातील 80 वर्षीय वृद्ध वडिलांच्या दवाखान्याचा होणारा खर्च, मुलांचे शिक्षण व मुलींच्या लग्नाची चिंता भेडसावत असताना दुष्काळ व नापिकीस कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना 27 डिसेंबर 2019 रोजी मृत्यू झाला आहे. मयत महाळप्पा गाडेकर यांच्या कुटुंबात 4 एकर शेतीवर सोसायटीचे व खाजगी कर्ज असल्याचे कळते मयत महाळाप्पा गाडेकर यांच्या पश्चात वडील पत्नी 2 मुली व 1 मुलगा आहे. सदर शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याने बाणेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.





























































