
दोन वर्षापूर्वी बाळासाहेब थोरात भाजपच्या संपर्कात होते असा घणाघाती आरोप विखे पाटील यांनी केला. तसेच बाळासाहेब थोरात कोणाकोणाला भेटले होते याची सर्व माहिती माझ्याकडे असल्याचा दावाही विखे-पाटलांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. त्यात त्यांचे स्वत:चे कर्तुत्व काहीच नाही. नगर जिल्ह्यातील 12 पैकी फक्त 3 जागा त्यांनी लढवल्या आणि त्यात त्यांना कसेबसे यश मिळाल्याचेही विखे-पाटील म्हणाले. थोरात यांनी माझ्या काँग्रेस प्रवेशाची चिंता करू नये, कारण ते स्वत: दोन-तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते, असा आरोप विखे-पाटील यांनी केला.
… म्हणून भाजप नेत्यांची भेट घेतली होती, विखे-पाटलांच्या आरोपांवर थोरातांची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, मी काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. यासंबंधीच्या अफवा असून ते माझ्या बदनामीचे षडयंत्र आहे. आमच्यातील वाद आता मिटला असून आम्ही एकत्र आलो आहोत. ज्या तक्रारी झाल्या, त्याबद्दल पक्ष जो निर्णय घेईल, तो आम्हा सर्वांना मान्य राहील, असे मुंबईतील बैठकीतच मान्य करण्यात आलेले आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.



























































