राजस्थानमध्ये थंडीमुळे 10 नवजात बालकांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

राजस्थानमध्ये एका महिन्यात 77 बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसातच 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. थंडीमुळे या बालकांचा मृत्यू झाला आहे असे चौकशी समितीने सांगितले आहे.

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील जेके लोन इस्पितळात गेल्या दोन दिवसांत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण महिन्यात 77 बालकांचा मृत्यू झाल्याने राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमली होती. त्या समितीने संबंधित “डॉक्टरांना क्लीन चीट दिली आहे.

समितीने आपल्या अहवालात सांगितले की बालकांच्या उपचारात कुठलीच कमतरता राहिली नाही. मृत झालेल्या 10 बालकांपैकी 5 बालक हे एक महिन्यांपेक्षा छोटे होते. जेव्हा उपचारासाठी या बालकांना दुसर्‍या इस्पितळात हलवले जात, तेव्हा त्यांचे पालक त्यांना जीपमध्ये घालून इस्पितळात नेत. त्यामुळे बालकांना गळ्याचा संसर्ग झाला. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच आयसीमध्ये 53 खाटांवर 70 हून अधिक बालकांचा इलाज करण्यात आला. तेव्हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने दुसर्‍या बालकांनाही संसर्ग झाला. त्यामुळेही बालकांचा मृत्यू झाल्याचे समितीने सांगितले.