महिलेला लोकलमधून ढकलणारा गजाआड, एक्स्प्रेसमध्ये करायचा महिलांना टार्गेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी गुजरात एक्स्प्रेसने प्रवास करणाऱया नगमा अन्सारी या अपंग महिलेला चोरीच्या हेतूने धावत्या एक्स्प्रेसमधून ढकलून देणाऱयाला रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मोहम्मद अस्लम उमर शेख असे त्याचे नाव आहे. उधारीचे पैसे देण्यासाठी तो महिलांच्या डब्यामध्ये चढून चोऱया करत असायचा.

या प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ निरीक्षक सोनावणे यांच्या पथकातील शहाजी निकम आदीने तपास सुरू केला. दोन दिवसांपूर्वी मोहम्मद हा दादर रेल्वे स्थानक येथे आला होता. तो गुजरात एक्स्प्रेसच्या महिला कोचजवळ फिरताना पोलिसांना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व कसून चौकशी केल्यावर मोहम्मदने गुह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

वेश बदलून राहिला 

मोहम्मद हा पूर्वी रेल्वेत वस्तू विकण्याचे काम करायचा. त्यामुळे त्याला रेल्वेतील सर्व माहिती होती. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी तो वेश बदलत होता. पण त्याची चालण्याची पद्धत आणि पिशवी पकडण्याची स्टाइल यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. एका गुह्यात मोहम्मद हा 8 वर्षे तुरुंगात होता. दोन वर्षांपूर्वी तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता