
टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन टी-20 मालिकेचा दुसरा सामना इंदूरमध्ये झाला. हा सामना टीम इंडियाने 7 विकेट राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या 143 धावांचे आव्हान टीम इंडियाने 18 व्या षटकामध्ये गाठले. राहुलने 45, शिखरने 32 आणि विराटने नाबाद 30 धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून के.एल. राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकीय सुरुवात करून दिली. फॉर्मात असणारा राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर धवनही 32 धावांवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाला विजयासमिप आणले. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असताना अय्यर 34 धावांवर बाद आरामात सामना जिंकून दिला. यानंतर विराटने षटकार ठोकत टीम इंडियाला सामना जिंकून दिला.
That’s that from Indore.#TeamIndia win by 7 wickets. Lead the three-match series 1-0.#INDvSL pic.twitter.com/5mtCxcHFHr
— BCCI (@BCCI) January 7, 2020
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांना पाहुण्या संघाला 9 बाद 142 धावांमध्ये रोखले. श्रीलंकेकडून कुसाल परेराने सर्वाधिक 34 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने 3, नवदीप सैनीने आणि कुलदीप यादवने 2, पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक बळी घेतला.




























































