नॉनस्टॉप 5 दिवस चालणार मोबाईल बॅटरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलची बॅटरी सलग पाच दिवस चालू शकेल, याबाबतचे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी केले आहे. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रिक कारही पुन्हा चार्ज न करता 1000 किमीपेक्षा जास्त चालवली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी हा महत्त्वपूर्ण प्रयोग केला आहे.

संशोधकांच्या टीमने सल्फर कॅथोडस्च्या डिझाईनला रि-कॉन्फिगर करून यशस्वीपणे सध्याची बॅटरीतील कॉम्बिनेशनच्या जागी वापरून पाहिले. या कॉम्बिनेशनच्या मदतीने कोणत्याही अडथळाकिना बॅटरीची क्षमता प्रचंड काढली असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले. यासाठी ऑस्ट्रेलिया सरकार आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक भागीदारांकडून 2.5 मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला आहे. नकीन बॅटरी पर्याय येत्या दोन ते चार वर्षात वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज प्रकल्पाचे प्रमुख डॉ. महदोख्त शाईबनी यांनी व्यक्त केला.