क्षेपणास्त्रामुळे युक्रेनचे विमान पडले, इराणने चूक मान्य केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमध्ये तेहरान विमानतळावर उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये युक्रेनचे विमान कोसळले होते. हे विमान क्षेपणास्त्रामुळेच पडल्याचं इराणने मान्य केलं आहे. हे विमान चुकीने क्षेपणास्त्राचे लक्ष्य बनल्याचे इराणने कबूल केलं आहे. या दुर्घटनेत 176 जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेन, कॅनडा आणि अमेरिका या तीन देशांनी हे विमान क्षेपणास्त्रामुळेच पडल्याचा आणि आपल्याकडे तशी सबळ माहिती असल्याचा दावा केला होता.

iran-tehran-crash-sight

इराणच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने या दुर्घटनेसंदर्भात आणि विविध देशांनी केलेल्या आरोपांसंदर्भात एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर इराणने ही मानवी चूक होती असं म्हटले आहे. सुरुवातीला इराणने हे विमान तांत्रिकी कारणांमुळे कोसळल्याचे म्हटले होते.

iran-crash-rescue-bodies

युक्रेन हवाई कंपनीच्या या विमानामध्ये 82 इराणचे आणि 63 कॅनडाचे नागरीक प्रवास करत होते. त्यांच्याशिवाय युक्रेनचे 11, स्वीडनचे 10, अफगाणिस्तानचे 4 आणि जर्मनी, इंग्लंडचे प्रत्येकी 3 नागरीक याच विमानातून प्रवास करत होते. युक्रेनची राजधानी कीवला जात असताना 8 जानेवारी रोजी हे विमान तेहरानमध्ये कोसळलं होतं.