
नगर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्या भातोडी गावच्या उपसरपंचपदी राजू पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. पटेल हे शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. पटेल यांच्या रूपाने पाहिल्यानंदाच ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
गावचे तत्कालीन उपसरपंच भरत लबडे यांनी 30 डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 1 जानेवारीला सभेमध्ये तो बहुमताने मंजूर करण्यात आला. गावच्या सरपंच संगीता नेटके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उपसरपंच निवडणूक झाली. पार पडली. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. यावेळेत राजूभाई पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्ज छाननीत तो वैध ठरला. पटेल यांचा एकमेव अर्ज असल्याने सरपंच संगीताताई नेटके यांच्या अध्यक्षतेखाली पटेल यांची निवड बिनविरोध करण्यात आली. पटेल यांच्या अर्जावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केली. दुपारी 2 वाजता सरपंच संगीता यांनी राजू पटेल यांची निवड घोषित केली. त्यांच्या निवडीबद्दल सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार केला.


























































