
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पामुळे दोन शहरे एकमेकांना जोडली जाऊन प्रवासाचे अंतर कमी होईल. मात्र हे होत असताना शिवडी व आसपासच्या खाडी परिसरात प्रत्येक हिवाळय़ात येथे येणाऱया ग्रेटर फ्लेमिंगोंचे काय होणार, हा प्रश्न सर्वांनाच आहे. यामुळेच मी हा प्रकल्प पाहण्यास आलो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फ्लेमिंगोंच्या स्थलांतराबाबत चिंता व्यक्त केली.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (मुंबई पारबंदर) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणीचा (गर्डरचा) शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. 17 हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी लागणारा दोन ते अडीच तासांचा वेळ कमी होऊन अर्ध्या तासावर हे अंतर येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठय़ा प्रमाणात तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी शिवडी खाडी परिसरातील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या वास्तव्याबाबत चिंता व्यक्त केली. प्रकल्प स्थळावर ग्रेटर फ्लेमिंगो हजर असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक हिवाळय़ात या ठिकाणी येणाऱया ग्रेटर फ्लेमिंगोंच्या वास्तव्याबद्दल मलाही चिंता आहे. त्यामुळेच हा प्रकल्प पाहण्यासाठी मी आलो आहे. शिवडी ते न्हावा शेवा या प्रकल्पामुळे फ्लेमिंगोच्या वास्तव्यास कुठलाही धोका पोहचणार नाही. या ठिकाणी येणाऱया फ्लेमिंगोची संख्या कमी होणार नाही तर ती वाढतच आहे. पक्षी व आपल्याला दोघांनाही अस्तित्वाचा मार्ग सापडला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबई-नवी मुंबईला जोडणारा हा देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून वेळेपूर्वीच तो पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई नवी मुंबईला जोडली जाणार असून राज्यातील नव्हे तर देशातील हा महत्त्काकांक्षी प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.
असा आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक
– मुंबई शहरातील शिवडी ते न्हावा शेवा असा सुमारे 22 कि.मी. लांबीच्या 6 पदरी पूल या प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात येणार आहे.
– या पुलाची समुद्रातील लांबी 16.5 कि.मी. असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किती इतकी आहे.
– या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजीनगर व राष्ट्रीय महामार्ग-4 ब कर चिर्ले गाकाजवळ आंतरबदल आहेत.
प्रकल्पाची सद्यस्थिती
– हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या (जेआयसीए) कर्ज सहाय्याने राबकिण्यात येत आहे.
– प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य क 1 इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे.
– प्रकल्पाची डिसेंबर 2019 अखेर सुमारे 19 टक्के इतकी आर्थिक प्रगती झाली आहे.
– या पुलासाठी 2200 पिलर टाकण्यात येणार असून त्यापैकी 440 पिलर टाकण्यात आले आहेत.
– हा प्रकल्प सप्टेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.



























































