गाझियाबाद येथे विमानाचे एक्प्रेस-वेवर इमर्जन्सी लँडिंग; पंखा तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणा-उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या गाझियाबादमधील परीफेरल एक्सप्रेस-वेवर हवाई दलाच्या ‘एनसीसी’च्या विमानाचे इमरजन्सी लँडींग झाले. यात विमानाच्या पंख्याचा चक्काचूर झाला. सुदैवाने दोन पायलट्स सुखरूप आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 हा पेरीफेरल एक्सप्रेस-वे म्हणून ओळखला जातो. राजधानी दिल्लीपासून अवघ्या 50 कि.मी. वर हा सहापदरी रस्ता आहे. दुपारी 1.45 च्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे एनसीसीच्या विमानाचे लँडींग झाले. विमानात दोन पायलट होते. सुदैवाने दोघेही सुखरूप आहेत. लँडींग होताना विमानाचा डावा पंखा चक्काचूर झाला आहे, अशी माहिती गाझियाबादचे पोलीस अधिक्षक कलानिधी नैथानी यांनी दिली. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, अपघातानंतर एक्सप्रेस-वेवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. बघ्यांचीही गर्दी झाली.