
नागरीकत्व संशोधन कायदा आणि अर्थात CAA आणि नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी म्हणजेच NRC विरोधात दिल्लीतील शाहीन बाग इथे आंदोलन सुरू आहे. जवळपास आठवडाभरापासून हे आंदोलन सुरू असून इथे वार्तांकन करायला गेलेल्या दीपक चौरसिया या पत्रकारासोबत धक्काबुक्की करण्यात आली.
Unacceptable heckling/manhandling of senior journalist @DChaurasia2312 at Shaheen Bagh. You have a problem with a section of the media? Just switch off the channel.. breaking cameras, manhandling journalists is plain and simple goondagiri. Culprits should be arrested.
— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) January 25, 2020
चौरसिया हे ज्या वृत्तवाहिनीचे प्रमुख आहेत त्या न्यूज नेशन वाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. आंदोलन करणाऱ्यांनी चौरसिया यांना धक्काबुक्की केली आणि कॅमेऱ्याची नासधूस केली असं या वाहिनीने म्हटले आहे.
भाजपने या हल्ल्याचा निषेध केला आहे. भाजपचे प्रभात झा यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटले आहे की या प्रकारांमुळे देशाची बदनामी होत आहे. आरोप केला जातोय की ही झटापट होत असताना पोलीस तिथे उपस्थित होते आणि त्यांनी हस्तक्षेप केला नाही. आतापर्यंत धक्काबुक्की करणाऱ्यांपैकी एकालाही अटक केली नसल्याचं वृत्तवाहिनीतर्फे सांगण्यात आलं आहे.























































