जोशमे होश गवाँ बैठा, शरजील इमामची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजद्रोहाच्या आरोपात अटक झालेल्या शरजील इमामला पोलिसांनी अटक केले होती. उत्साहाच्या भरात आसाम तोडण्याची आपण भाषा केली अशी कबुली त्याने दिली आहे. तसेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात त्यानेच भाषण केले होते, त्या व्हिडीओमध्ये कुठलीच छेडछाद झाली नव्हती असे त्याने म्हटले आहे.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात शरजील इमामने चिथावणीखोर भाषण दिले होते. या भाषणात त्याने उत्साहाच्या भरात आसाम राज्य देशापासून तोडण्याचे म्हटले होते. आपण असे म्हटले होते अशी त्याने कबुली दिली आहे. परंतु आपल्या भाषणाचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होत पूर्ण व्हिडीओ नव्हता असेही त्याने म्हटले आहे. शरजीलने संपूर्ण विचार करून आणि रणनीतीचा भाग म्हणून हे भाषण केले होते असा दावा तपास अधिकार्‍यांनी केला आहे.

तपासादरम्यान शरजीलने सांगितले की 25 जानेवारी रोजी बिहारमध्ये भाषणासाठी पोहोचला ओता. तेव्हा आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो भुमीगत झाला. शरीफने आपला मोबाएले बंद केला आणि आपल्या गावी पोहोचला. त्याच्या गावातूनच पोलिसांनी त्याला अटक केली.