
केरळमध्ये काही दिवासांपूर्वी दोन रूग्ण आढळला होते. मात्र आता तिसरा रुग्ण ही केरळमध्येच आढळला आहे. हा व्यक्ती केरळमधील कसारगोड येथील आहे तो काही दिवसांपूर्वी चीनच्या वुहान शहरामधून आला होता. दरम्यान, रुग्णाला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा केरळमधून तीन रुग्ण समोर आले आहेत. यामुळे कर्नाटक मधील काही जिल्ह्यांना हायअॅलर्ट देण्यात आला आहे. केरळचे आरोग्य अधिकारी केके शैलजा यांनी सांगितले की, रुग्णावर कांजनगाड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे . रुग्ण काही दिवसांपूर्वीच वुहानला जाऊन परत आला असल्याची माहिती शैलार यांनी दिली आहे.
























































