
ज्यांनी सबका साथ सबका विकास अशी घोषणा दिली त्यांनीच लोकांचा विश्वासघात केला अशी टीका तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केली आहे. संसदेत त्यांनी केंद्र सरकारवर सीएए, एनसीआर आणि एनपीआरवरून कोरडे ओढले.
महुआ मोईत्रा म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत 130 कोटी जनतेपैकी 23 कोटी जनतेने भाजपला मतदान केले. भाजपला फक्त एका धर्माच्या लोकांनी मतदन केले नाही. भाजपने सबका साथ सबका विकास अशी घोषणा दिली होती. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी भाजपला मतदान केले होते. परंतु भाजपनेच या मतदारांचा विश्वासघात केल्याची टीका मोईत्रा यांनी केली आहे.
हिटलरच्या नाझी सरकारची उपमा मोईत्रा यांनी दिली. तसेच केंद्र सरकार नागरिकत्व कायदा आणि एनआरसी आणि एनपीआर याचा वापर हत्यारासारखे करत आहेत असे मोईत्रा म्हणाल्या. त्यानुसार भाजप लोकांची ओळख पटवणार तसेच अनेक लोकांना नागरिकत्वापासून वंचित ठेवून त्यांना देशाबाहेर काढणार असेही मोईत्रा म्हणाल्या.




























































