मुलीचा सरस्वती पुजन करतानाचा फोटो शमीने केला शेअर, धर्मांधांचे आकांडतांडव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर असतानाच शमीने इंस्टाग्रामवर मुलीचा एक असा फोटो शेअर केला ज्यामुळे धर्मांधांनी आकांडातांडव सुरू केला. शमीने मुलीचा सरस्वती पुजन करतानाचा साडीतील फोटो शेअर केल्याने मुस्लिम समाजातील काही धर्मांधांनी त्याला ट्रोल केले, तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी मात्र त्याला ‘खरा हिंदुस्थानी’ असे म्हटले आहे.

मोहम्मद शमी याने मुलगी आयराचा (Aaira) एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खुप सुंदर दिसतेय बेटा… खुप खुप प्रेम…. इश्वर तुला आनंदात ठेओ… लवकर भेटू… (Looking so sweet beta, love you so much. God bless you beta, see you soon) असे कॅप्शन शमीने या फोटोला दिले आहे. फोटोमध्ये शमीची मुलगी पिवळ्या आणि लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तिच्या मागे सरस्वती पुजन केल्याचे दिसत असून दिवाही जळताना दिसतोय.

शमीने हा फोटो शेअर केल्यानंतर धर्मांधांनी त्याला तू मुसलमान असून असे तुला शोभत नाही असे म्हणत ट्रोल केले. तसेच तू मुसलमान असल्याने पुजा-अर्चामध्ये सहभागी होऊ नको, असा सल्लाही अनेकांनी दिला.

shami

काही धर्मांधांनी शमीला ट्रोल केले आहे, तर अनेकांनी शमीच्या या फोटोला चांगल्या कमेंट केल्या आहेत.

shami2