भाजप कार्यकर्त्याला धमकी; गोव्यात आमदाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांबरे यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार खंवटे यांनी इतर विरोधी पक्षाच्या आमदारां सोबत सरकार विरोधात आघाडी उघडली होती.या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ता असलेल्या म्हांबरे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन आमदार खंवटे यांच्यावर अनेक आरोप केले होते.त्यानंतर विधानसभा संकुलात म्हांबरे आणि खंवटे आमने सामने आले होते.त्यावेळी खंवटे यांनी आपल्या हाताला पकडून धमकी दिल्याची तक्रार म्हांबरे यांनी सभापती आणि पर्वरी पोलिसात दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा घडलेल्या घडामोडींमध्ये सभापतींच्या परवानगीनंतर पर्वरी पोलिसांनी रात्री उशिरा आमदार खंवटे यांना अटक करून पहाटे त्यांची जामिनावर सुटका केली.