
हिंदुस्थानसाठी एक गुड न्युज आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस पसरल्याने 645 हिंदुस्थानींना परत आणण्यात आले. कुठल्याही हिंदुस्थानींला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांची तपासणी केल्यानंतर रीपोर्टमधून ही माहिती कळाली आहे.
Health Ministry: All 645 evacuees from Wuhan, China have tested negative for #Coronavirus. No new case has been reported pic.twitter.com/C3nuKzgR3j
— ANI (@ANI) February 6, 2020
कोरोना व्हायरल पसरल्यामुळे हिंदुस्थान सरकारने 645 हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी आणले होते. सर्व नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यांना कोरोना व्हायरसची कुठलीच लागण झाली नसल्याचे निष्पण झाले आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने सर्व नागरिकांना हिंदुस्थानात आणले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व नागरिकांना आरोग्य छावणीत ठेवण्यात आले होते. चीनच्या वुहान प्रांतातून हा व्हायरस देशभरात पसरला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत 1 लाख 18 हजार 785 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात कुठल्याही व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.



























































